1 सप्टेंबर पासून केरळ येथे स्पर्धा.350 स्पर्धक सहभागी
औंध/वार्ताहर
कोचीन ( केरळ ) येथे दिनांक 1 सप्टेंबर पासुन 23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाची निवड चाचणी सह्याद्री कुस्ती संकुल,वारजे पुणे येथे पार पडली. सदर निवड चाचणीमध्ये राज्यातील साधारण 350 कुस्तीगीरांनी सहभाग घेतला होता.
निवड चाचणी मधून खालील संघ निवडण्यात आला आहे.
फ्री स्टाईल
57 किलो – सुरज आसवले, 61 किलो संतोष परीट, 65 किलो शुभम पाटील, 70 किलो संदीप लटके, 74 किलो रविराज चव्हाण, 79 किलो आकाश माने, 86 किलो समिर शेख,92 किलो पृथ्वीराज पाटील, 96 किलो ओमकार चौगले,130 किलो पृथ्वीराज मोहोळ.
ग्रिकोरोमन स्टाईल
55 किलो किरण गोहड, 60 किलो प्रविण पाटील, 63 किलो गोविंद यादव, 67 किलो विनायक पाटील,72 किलो ओंकार पाटील, 77 किलो गोकुळ यादव,82 किलो आशिष यादव, 87 किलो दर्शन चव्हाण, 97 किलो पृथ्वीराज खडके, 130 किलो तुषार डुबे
महिला
50 किलो नेहा चौगुले, 53 किलो विश्रांती पाटील, 55 किलो स्मिता पाटील, 57 किलो सोनाली मंडलिक, 59 किलो अंकिता शिंदे,62 किलो वैष्णवी पाटील,65 किलो अमृता पुजारी, 68 किलो प्रतिक्षा बागडी, 72 किलो वेदांतीका पवार, 76 किलो सायली दंडवते.
निवड झालेल्या यशस्वी मल्लांचे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सदस्य कुस्तीशौकीन यांनी अभिनंदन केले आहे.