प्रतिनिधी / बेळगाव :
बेळगावमधील सर्व ढोल-ताशा पथकांनी एकत्र येऊन शनिवार दि. ५ रोजी सायंकाळी ७ वाजता दिवाळीच्या अनुषंगाने महावादन सोहळा आयोजित केला आहे. छत्रपती शिवाजी उद्यानामधील शिवसृष्टीसमोर सायंकाळी ७ वाजता हा सोहळा होणार आहे.
यामध्ये २०० ढोल, ६० ताशा आणि ५१ ध्वज असणार आहेत. अलिकडच्या काळात शिवजयंती मिरवणूक व गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान ढोल-ताशा पथक सहभागी होत असून ही एक स्वागतार्ह बाब आहे. डी.जे. ऐवजी ढोल ताशांना प्राधान्य दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी होणारा महावादन सोहळा वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.