कुडाळ – वार्ताहर
कुडाळ तालुका ग्रामसेवक युनियनच्या नूतन सर्व कार्यकारिणीवर ग्रामसेवक महिला सदस्यांना संधी देण्यात आली. महिला राज असणारी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ही पहिली कार्यकारिणी आहे. या तालुका शाखेच्या अध्यक्षपदी सोनिया संतोष पालव – पांजरी यांची ,सचिवपदी सुषमा दत्ताराम कोनकर यांच्यासह अन्य कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. महाराष्ट्र ग्रामसेवक युनियन डी.एन.ई १३६ सिंधुदुर्ग अंतर्गत कुडाळ तालुका शाखेची सन 2023 ते 2027 या कालावधीसाठी नवनिर्वाचित कार्यकारिणी निवड ओरोस येथील ग्रामसेवक भवनात सोमवारी करण्यात आली. या कार्यकारिणीवर महिला सदस्यांना संधी देण्याचा निर्णय यावर्षी या युनियनच्या सर्व सदस्यांनी एकमताने घेण्यात आला.
नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. अध्यक्ष सोनिया पालव – पांजरी , सचिव – सुषमा काणेकर,उपाध्यक्षा सपना गणपत मसगे व शालिनी बाबु कोकरे, कोषाध्यक्ष अन्वी हेमंत शिरोडकर ,सहसचिव -रश्मी विक्रमसिह रोहीले – राउळ ,प्रसिध्दीप्रमुख – सानिका सागर पालव-घुगरे , कायदे विषयक सल्लागार सरीता शंकर धामापुरकर व श्रध्दा प्रकाश आडेलकर यांची बिनविरोध करण्यात आली.सदरच्या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवृत्त विस्तार अधिकारी भास्कर केरवडेकर व निवडणूक निरीक्षक म्हणून सिंधुदूर्ग जिल्हा ग्रामसेवक युनियनचे जिल्हा अध्यक्ष संतोष गावडे यांनी काम पाहिले.
सदर निवडणूक कार्यक्रमाला ग्रामसेवक तालुका युनियनचे मावळते अध्यक्ष मनमोहन धुरी ,सचिव संतोष पालव,कार्यकारणी सदस्य श्री.कसालाकर,गुरुनाथ गावडे ,नितेश तांबे,कृष्णा पेडणेकर,भीमराव घुगे,रामचंद्र वणकर,भूषण बालम,महेश वालावलकर,रघुनाथ भोगटे,वैभव सावंत , गोविंद तोरसकर आदीसह अन्य माजी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.