प्रारंभीची किमत 11.99 लाख रुपये : डबल एअर बॅगसह अन्य फिचर्स
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मल्टीनॅशनल ऑटो निर्माती कंपनी असलेल्या महिंद्रा ऍण्ड महिंद्रा यांनी भारतामध्ये आपली नवीन स्कॉर्पिओ-एन बाजारात दाखल केली आहे. स्कॉर्पिओ एन एसयूव्हीच्या पेट्रोल इंजिनसह झेड2 ट्रिम या मॉडेलची सुरुवातीची किमत 11.99 लाख रुपये (एक्स शोरुम) राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. महिंद्राने स्कॉर्पिओ एनची देशामध्ये झेड2, झेड4, झेड6, झेड8एल, आणि झेड8एल (6एस) यासह सहा मॉडेल्स बाजारात आणली आहेत.
स्कॉर्पिओ एनच्या टॉपच्या मॉडेलमध्ये एन झेड8एलची किमत 23.90 लाख रुपये राहणार आहे. हा एसयूव्ही 7 कलर डीप फॉरेस्ट, एव्हरेस्ट व्हाईट, नेपोली ब्लॅक, डेजलिंग सिल्वर, रेड रेज, रॉयल गोल्ड आणि ग्रॅड कॅन्यनमध्ये उपलब्ध राहणार आहे.
स्कॉर्पिओ एनच्या अन्य सुविधा
महिंद्राच्या एन झेड2 एसयूव्ही सेफ्टीबाबत माहिती देताना एबीएस, इबीडी, रियर पार्किंग सेंसर, डबल एअरबॅग, फ्रन्ट आणि रिअरमध्ये वेंटिलेटेड डिस्क बेक आदीची सुविधा उपलब्ध होणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
पेट्रोल-डिझेलमध्ये मॉडेल
2.0 लिटर आणि टर्बोचार्ज्ड युनिट पेट्रोल इंजिन असून जे 200 बीएचपी पीक पॉवर आणि 370 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करणार आहे यासह हायर ट्रिम लेव्हलच्या तुलनेत डिझेल युनिट काहीसे कमी शक्तीशाली असल्याचे सांगितले आहे.
अन्य नोंदी
wलाँचिंग होताच 1 मिनिटात 25,000 गाडय़ांचे बुकिंग प्राप्त
w बुकिंग पोर्टल सुरु केल्यानंतर 30 मिनिटात 1 लाखापेक्षा अधिकचे बुकिंग
w एसयूव्ही एन याच्या तुलनेत एसयूव्ही700 यांचे बुकिंग 1 तासात जवळपास 50,000 इतके झाले होते.
w पहिल्या 25,000 बुकिंग करणाऱया ग्राहकांना मिळणार सुरुवातीच्या किमतीमध्ये
w चालू वर्षात एन एसयूव्ही 20,000 युनिट्सचे उत्पादन घेण्यात येणार