मुंबई
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी महिंद्रा आपली नवी स्कॉर्पिओ भारतीय बाजारात उतरविण्याची तयारी करत आहे. सदरची गाडी जूनमध्ये लाँच केली जाणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भातील माहिती टिजरच्या माध्यमातून समोर आली आहे. नवी स्कॉर्पिओ 27 जून रोजी भारतीय रस्त्यावर उतरेल, असे सांगितले जात आहे. सुव्ह गटातील या कारला सिंगल ग्रिल दिले आहे, ज्यामुळे कारचा समोरचा भाग आकर्षक दिसतो आहे. यामध्ये नव्या डिझाईन्सचे एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, नवे फॉग लॅम्प, सी शेप्ड एलईडी डे टाईम रनिंग लाईट्स अशा सुविधा दिल्या जाणार आहेत.
कोणत्या मिळणार सुविधा ः गाडीचा अंतर्गत भाग हा लक्झरी आणि स्टायलिश स्वरुपाचा असण्याची शक्मयता आहे, असे टिजरच्या माध्यमातून सांगितले जात आहे. यासोबतच या गाडीत नवे डॅश व सेंटर कन्सोल, फ्लॅट बॉटम स्टिअरिंग व्हील, रुफ माऊंटेड
स्पीकर, लेदर सीट, वायरलेस चार्जिंग पॅड अशाही सुविधा मिळणार आहेत.