वारकरी शिक्षण संस्था इमारत भूमिपूजनप्रसंगी नासीर बागवान यांचे आवाहन
वार्ताहर /नंदगड
वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून अनेकजण भक्तिमार्गात आले. भक्तिमार्ग हा उत्तम मार्ग असून याद्वारे जीवन सार्थकी बनविण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा. वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बालकांना व युवकांना टाळ-मृदंग, तबला, पेटी, गायन आदी कला निश्चितच अवगत होतील. अशा धार्मिक कार्यासाठी आपण नेहमीच मदतीसाठी पुढे राहू, असे आवाहन मलप्रभा साखर कारखान्याचे चेअरमन नासीर बागवान यांनी केले.
होनकल (ता. खानापूर) येथे खानापूर तालुका वारकरी सांप्रदायिक शिक्षण संस्था शिक्षण इमारतीचे भूमिपूजन सद्गुरु विठ्ठल वासकर पंढरपूर यांच्या हस्ते करण्यात आले. इमारत पायाखोदाई मलप्रभा साखर कारखान्याचे चेअरमन नासीर बागवान यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुती मादार होते. यावेळी इमारत उभारणीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
व्यासपीठावर उद्योजक मारुती वाणी, शिवाजी पाटील (बेकवाड), बाबुराव पाटील, भाजपचे प्रमोद कोचेरी, परशराम मयेकर, दोडमणी, यल्लाप्पा कातगार, मंजुनाथ पाटील आदींसह खानापूर तालुक्मयातील वारकरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, सभासद तसेच अनेक वारकरी उपस्थित होते.