कलाश्री बंबची चौदावी सोडत मान्यवरांच्या उपस्थितीत
प्रतिनिधी /बेळगाव
उद्यमबाग येथील कलाश्री बंब अॅण्ड स्टील फर्निचरच्या चौदाव्या सोडतीत मण्णूरचे मल्लापा काकतकर भाग्यवान विजेते ठरले. ही सोडत इनरव्हील क्लब व कॅपिटल वनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.
या निमित्ताने कलाश्रीचे मालक प्रकाश डोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा शालीन चौगुले, उपाध्यक्षा सुनिता हणमशेठ, गायनॉलॉजिस्ट डॉ. सविता कद्दू, सचिव पुष्पांजली मुक्कण्णावर, स्वाती उपाध्ये, शिवाजीराव हंडे, रोटरी क्लब ऑफ मीडटॉनच्या नीता बिडीकर, पी.डी. मोटार, कुमार हिप्परगी यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाला. त्यानंतर रुद्रस्वामी मठाचे चन्नबसव देवरू यांच्या हस्ते कलाश्री निर्मित थ्री इन वन या सोलार संचाचे पूजन करून तो लॉन्च करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचा भेटवस्तू व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. सविता कद्दू यांनी उपस्थित ग्राहकांना विशेष करून महिलांना कॅन्सर रोगापासून आपला बचाव कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. यानिमित्त कलाश्रीचा थ्री इन वन बंब तयार करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या भूषण मरुचे, साहील गौंडवाडकर, बसवंत जाधव, रवी जाधव, मल्लापा बांडगी, प्रवीण पाटील, दिनेश मरुचे, नारायण खांडेकर, जोतिबा साळवी यांचा भेटवस्तू व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याचबरोबर वेळेत उपस्थित असलेले पाच भाग्यवान ग्राहक साहील गौंडवाडकर, अनुसया डोळेकर, प्रकाश बेळवटकर, विठ्ठल सांबरेकर व रेणुका सारंग यांनाही भेटवस्तू देऊन गौरविले. त्यानंतर कॅपिटल वनचे शिवाजीराव हंडे यांच्या हस्ते भाग्यवान विजेत्याची चिठ्ठी काढण्यात आली. यावेळी कलाश्रीचे ग्राहक, डीलर, कर्मचारी, हितचिंतक उपस्थित होते. सूत्रसंचालन टी. डी. पाटील यांनी केले. संचालिका सुकन्या डोळेकर यानी आभार मानले.