वायंगणी ग्रामपंचायत गैरकारभाराच्या चौकशीची केली होती मागणी
आचरा : प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायतमध्ये जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत झालेल्या गैरकारभाराची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी 10 मार्चला तक्रारी अर्जाने केल्यानंतरही मा. गटविकास अधिकारी मालवण यांच्याकडून कोणतीही चौकशी झालेली नाही. किंवा संबंधितांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. म्हणून वायंगणी ग्रामपंचायतच्या सदस्या मालती जोशी या 15 ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पं.स. कार्यालय मालवण समोर उपोषणास बसणार आहेत. जोपर्यंत वायंगणी ग्रा.पं. मध्ये झालेल्या गैरकारभाराची चौकशी करून संबंधीतांवर अपहाराचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच ठेवणार असल्याचे सदस्या मालती जोशी यांनी सांगितले. याबाबतचे पत्र संबंधितांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
वायंगणी ग्रामपंचायत गैरकारभाराच्या चौकशीची केली होती मागणी
सदस्या मालती जोशी यांनी वायंगणी ग्रामपंचायतीच्या जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत झालेल्या गैरकारभाराची चौकशी व्हावी यासाठी गटविकास अधिकारी मालवण यांच्याकडे 10 मार्चला तक्रारी अर्ज करत कारवाईची मागणी केली होती या तक्रारी अर्जात त्यांनी म्हटले होते की ग्रा.पं.मध्ये जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२२ पर्यंत पांच वर्षाच्या कालावधीत बराच गैरव्यवहार झाला आहे. गावचा विकास व्हावा म्हणून आता शासनाकडून १५ वा वित्त आयोग ( आमचा गाव आमचा विकास) या योजनेतून शासनाकडून भरघोस निधी येतो. परंतु त्या निधीचा वापर मनमानीपणे केला जात आहे. १) या योजनेमधून ग्रामस्थांना देण्यासाठी इस्टूबिन खरेदी केले गेले. निविदा मागवितांना डसबीन, हँडवॉश खरेदी करणे. ४०० नग. प्रती नग १३५ रु. अशी निविदा मागविली गेली. ५४०००/- रु. बिल पेड करण्यात आले. परंतु डस्टबिनची किंमत बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी करून निधीचा अपहार करण्यात आला आहे. एकूण खरेदी केलेले नग ९२९ आहेत. २) त्याचप्रमाणे महिला व किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅड वाटप करणे. ६२० नग. प्रती सेट ४२ रु. परंतु त्याची मूळ किंमत (MRP) ३० रु. आहे. त्यामुळे बाजारभावापेक्षा जास्त दराने सॉनेटरी पॅड खरेदी केलेले असून अतिशय कमी दर्जाचे आहेत. ३) गरोदर मातांना पोषण आहार पुरविणे. ९० कीट. प्रती किट, ३३० रु. ४) पहिली ते चौथीच्या मुलांना पोषण आहार पुरविणे. २४ पॅकेट. प्रती पॅकेट ३३० रु. ५) मार्च २०२१ ला अंगणवाडीसाठी टि.व्ही. संघ खरेदी करण्यात आले. परंतु आजपर्यंत ते अंगणवाडीमध्ये २ वर्षे झाली तरी पोचलेले नाहीत. ६) शाळेसाठी देण्यात आलेली पाण्याची टाकी मार्च २०१२ मध्ये खरेदी केलेली आहे. परंतु आजपर्यंत ती शाळेमध्ये पाण्याच्या वापरासाठी लवलेली दिसत नाही. सदरखर्च सुद्धा तपासून पहावा. ७) अंगणवाडीसाठी देण्यात आलेले सौर प्यानेल यामध्ये सुद्धा गैरव्यवहार झालेला आहे असे नमूद केले होते.सदर तक्रारीनंतरही मा. गटविकास अधिकारी मालवण यांच्याकडून कोणतीही चौकशी झालेली नाही. किंवा संबंधीतांवर कोणतीही कारवाई केलेली नाही म्हणून वायंगणी ग्रामपंचायतच्या सदस्या मालती जोशी यांनी 15 ऑगस्ट रोजी उपोषणास बसण्याचा निर्धार केला आहे.