सलाईन लावण्यास मच्छीमारांचा नकार
मालवण -: बेमुदत उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी उपोषणकर्त्या पारंपरिक मच्छीमारांची प्रकृती खालवायला सुरूवात झाली होती. वैद्यकीय पथकाने तपासणीअंती तिघा जणांना सलाईन लावण्याची सूचना डॉक्टर्सनी केली. परंतु उपोषणकर्त्यांनी सलाईन लावण्यास तसेच गोळ्या घेण्यास नकार दिला. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने पारंपरिक मच्छीमार संतप्त झाले होते.