मालवण / प्रतिनिधी
दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण आणि मालवण तालुका सराफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दैवज्ञ भवन मालवण येथे तमाम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुवर्ण व्यावसायिक, कारागीर वर्ग साठी हॉल मार्क आणि HUID विषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती . या कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद मिळाला .जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून व्यावसायिक उपस्थित राहिले .भारतीय मानक ब्यूरो मुंबई 2 चे विभागीय अधिकारी श्री नरेश हरड यांनी हॉल मार्क विषयी उत्तम विस्तृत मार्गदर्शन केले . पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचे काम विपुल गणेश प्रभुलकर यांनी उत्तम प्रकारे केले .उपस्थित व्यावसायिक बंधूनी हॉल मार्क विषयी उत्तम प्रकारे माहिती घेऊन आपल्या शंकांचे निरसन करून घेतले .डॉ. विवेक रायकर तसेच अनिल मालवणकर यांनी सदर कार्यशाळा आयोजित केली होती . सदर कार्यशाळा प्रायोजक अनिल मालवणकर यांचे विशेष आभार मानले आहेत. सदर कार्यशाळा आयोजित करणे .तसेच कार्यशाळा नियोजन .निवेदक म्हणून दैसप विभागीय उपाध्यक्ष गणेश सखाराम प्रभूलकर सचिव दैवज्ञ हितवर्धक समाज मालवण यांनी उत्तम प्रकारे केले.