ऑनलाईन टीम/तरुण भारत
दिल्लीमधील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे (Shraddha Walker murder case) संपूर्ण देशात खळबळ उडाली. आफताबने श्रद्धाला ज्या पद्धतीनं मारलं त्याच्या या क्रूरतेचा सर्व स्थरातून निषेध करण्यात येतोय. ही घटना ताजी असताना दिल्लीमध्ये अशीच एक घटना घडली आहे. येथे एका महिलेने तिच्या मुलाला सोबत घेऊन आपल्या पतीचा खून केला आहे. या महिलेचे नाव नाव पूनम तर मुलाचे नाव दीपक असे आहे. हत्या झालेल्या पुरूषाचे नाव अंजन दास असे आहे. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, राजधानी दिल्ली येथे आणखी एक श्रद्धा हत्याकांडासारखे खळबळजनक खून प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. महिलेने आपल्या पतीचा खून करून मृतदेहाचे अनेक तुकडे केले. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले. तसेच हे तुकडे पांडव नगर परिसरातील मैदानावर फेकून देऊन, मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडालेली असताना ही घटना समोर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नेमका प्रकार काय?
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार दिल्लीमधील एका महिलेने मुलाला सोबत घेऊन आपल्या पतीची हत्या केली आहे. या महिलेचे नाव नाव पूनम तर मुलाचे नाव दीपक असे आहे. अनैतिक संबंधातून ही घटना घडली आहे. पत्नी कोमल दास हिने अंजन दास याला नशेच्या गोळ्या खाऊ घालून त्याचा खून केला. या सर्व प्रकरणात तिच्या मुलाने तिला साथ दिली. अंजनच्या मृत शरीराचे तब्बल २२ तुकडे करण्यात आले आणि ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले. यांनतर पूर्व दिल्लीच्या विविध भागात आरोपींनी अंजनच्या शरीराचे तुकडे हळू हळू फेकून दिले. यांनतर दिल्ली पोलिसांच्या क्राइमब्रांच ने फ्रीज जप्त केला आहे.