प्रतिनिधी /बेळगाव
सुभाषनगर दुसरा क्रॉस येथे गोंधळी समाजाच्यावतीने आषाढ मासमध्ये श्री मंगाई देवी यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. मागील 26 वर्षांपासून समाजबांधव एकत्र येऊन ही देवीची यात्रा करतात.
या जत्रेवेळी समाजातील महिला पाणी भरलेला कलश डोक्यावर घेऊन तसेच संबळ, टाळ, हुनहुनेच्या गजरात आणि भंडारा उधळत, उदो उदोचा जयघोष करत मंदिरापर्यंत जाऊन भक्तिभावाने पूजा करतात. यंदा या जत्रेचा अनेक समाज बांधवांनी लाभ घेतला. याप्रसंगी गोंधळी समाजाचे कार्यवाह गोपाळ बिसे, तालुका अध्यक्ष कृष्णा माने, पंडित बिसे, श्रीकांत बिसे, अमृत शिंदे, बसवराज माने, नारायण बिसे, भगवंत बिसे, यजमान बिसे, भीमराव शिंदे, कृष्णा शिंदे, संतोष बिसे आदी उपस्थित होते.