पणजी : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा येत्या 4 ऑक्टोबर रोजी होणारा वाढदिवस भरगच्च कार्यक्रमांनिशी त्यांच्या ओल्ड गोवा येथील निवासस्थानी साजरा होणार असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उद्धाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वा. होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाला राज्यसभा खासदार, भाजपाचे गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे व अन्य मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. सकाळी 9.30 ते दुपारी 1 या दरम्यान प्रसाद नेत्रालय ासुपर स्पेशलिटी नेत्र ऊग्णालय, उडुपी आणि गोवा आरोग्य संचालनालयाच्या नेत्रचिकित्सा विभागातर्फे डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. नेत्रऊग्णांना मोफत चष्मे व आवश्यक असल्यास मोफत शस्त्रक्रियाही केली जाईल. नेत्रचिकित्सा शिबिरासाठी येणाऱ्या ऊग्णांनी सोबत आधारकार्ड, मतदारकार्ड व आरोग्य विमा उतरवल्यास त्याची प्रत सोबत आणणे आवश्यक आहे.
अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, धारगळ, गोवा आरोग्य संचालनालयाचा आयुष विभाग, आयुर्वेद महाविद्यालय शिरोडा, श्री कामाक्षी होमओपेथिक महाविद्यालय शिरोडा, आयुष संशोधन केंद्र रायबंदर आणि सांडू फार्मास्युटिकल्सतर्फे मोफत आयुर्वेद व होमिपेथिक शिबिराचे आयोजन व औषधांचे वितरण करण्यात येईल. याच स्थळी होणाऱ्या अन्य कार्यक्रमात विविध विद्यालयांना संगणक, एलसीडी प्रॉजेक्टर व अन्य साहित्यांचे वितरण करण्यात येईल. त्यानंतर निवडक विद्यालयांना सेनेटरी नॅप्किन डिस्पेन्सर आणि इन्सिनरेटर मशिन्स प्रदान केली जातील. भाजपाच्या गोवा प्रदेश युवा मोर्चातर्फे सकाळी 9.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त दिवसभर औषधी वनस्पतींचे वितरण केले जाईल. सायंकाळी 5.30 वा. गेली 25 वर्षें राष्ट्रसेवेला समर्पित ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. रात्री 8 ते 10.30 या दरम्यान ‘निषाद’ निर्मित चांदणे स्वरांचे हा भावगिते, भक्तीगिते, चित्रपट गितांवर आधारीत बहारदार कार्यक्रम होणार आहे. या शिबिरांचा गुरजूंनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे मातृभूमी सेवा प्रतिष्ठानतर्फे कळविण्यात आले आहे.