संजद नेते उपेंद्र कुशवाह यांचा दावा
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये सत्तारुढ रालोआ सरकारचे नेतृत्व करणाऱया संयुक्त जनता दलाने विरोधी पक्षांचे अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. संजदच्या या दाव्यानंतर बिहारमधील राजकारण तापले आहे. यापूर्वी राष्ट्रपती निवडणुकीत राजदच्या 8 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा दावा भाजपने केला होता.
विरोधी पक्षांचे अनेक आमदार संजदच्या संपर्कात आहेत. या आमदारांची संख्या सध्या उघड करणे योग्य ठरणार नाही. काही काळानंतर यासंबंधीचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे उद्गार संजद नेते उपेंद्र कुशवाह यांनी काढले आहेत. कुठल्या पक्षाचे आमदार संपर्कात आहेत याचा खुलासा आम्ही करणार नाही. परंतु घडामोडींवर आमची नजर असल्याचे कुशवाह यांनी म्हटले आहे.