प्रतिनिधी,कोल्हापूर
मराठा समाजाला पन्नास टक्के मर्यादेच्यावर आरक्षण देत गेली 40 वर्ष राज्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी मराठा समाजाची फसवणूक करत आले आहेत. पण आता हे चालणार नाही.मराठा समाजाला ओबीसीमधून टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकारने पाऊले उचलावीत,अशी तीव्र भावना सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर व्यक्त केली.तसेच ओबीसी आरक्षणाचे पुर्ननिरीक्षण करा,यामागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांना द्या,अशी विनंतीही शिष्टमंडळाने मंत्री मुश्रीफ यांना केली. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी मराठा समाजाच्या भावाना मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
मराठा आरक्षणा संदर्भात सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने शनिवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची शासकीय विश्रामगृह येथे भेट घेवून चर्चा केली. याप्रसंगी बोलताना अॅङ बाबा इंदूलकर म्हणाले,मराठा समाजाला पन्नास टक्केची मर्यादा ओलांडून आरक्षण देत राज्यकर्ते,प्रशाकीय अधिकारी समाजाची फसवणूक करत आले आहे.हे आरक्षण न्यायालयात कधीच टिकाणार नाही.त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळणे महत्त्वाचे आहे.1994 ला ओबीसी आरक्षण 14 टक्के होते.पुढे ते कोणताही सर्व्हे न करता 30 टक्के करण्यात आले. या वाढीव आरक्षणाला कोणताही कायदेशीर आधार नाही.त्यामुळे ओबीसी आरक्षणाचे पुर्ननिरीक्षण करुन यामधील फुगीर आरक्षण रद्द करुन मराठा समाजाला हक्काचे आरक्षण देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत,अशी मागणी अॅङ इंदूलकर यांनी केली.यावेळी आर.के.पोवार,जयंत पाटील,बाबा पार्टे,अनिल घाटगे,किशोर घाटगे,माणिक पाटील-चुयेकर,मधूकर पाटील,बाबा महाडिक,सचिन तोडकर, चंद्रकांत पाटील,सुनिता पाटील आदींसह समाज बांधव उपस्थित होते.
पालकमंत्र्यांना मराठा आरक्षणासाठी वेळ नाही
मराठा आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी पालकमंत्र्यांनी शिष्टमंडळाला वेळ दिली.पण त्यांना मराठा आरक्षणाबाबत काही देण घेण नाही.त्यांना चर्चा करायला वेळ नाही.ते केवळ घोषणा करतात,पण प्रत्यक्षात काम काहीच करत नसल्याचा आरोप यावेळी शिष्टमंडळाने केला.
प्रशासक द्या,अन्यथा कोल्हापूर बंद
महापालिकेला गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासक नाही.पालकमंत्री केवळ आश्वासन देतात पण प्रत्यक्षात त्याची पुर्तता करत नाहीत.त्यामुळे कोल्हापूर महापालिकेला तत्काळ प्रशासक न मिळाल्यास शासनाच्या निषेधार्थ कोल्हापूर बंद ठेवण्याचा इशारा यावेळी शिष्टमंडळाने दिला.
हेरीटेजचे एकाच ठेकेदाराला काम
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृह येथे घडलेल्या दूर्घटनेची चौकशी निपष्पपणे व्हावी.हेरिटेजचे काम हे एकाच ठेकेदाराला दिले जाते.प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप महिलेला जीव गमवावा लागला आहे.त्यामुळे या प्रकरणाची चौकशी गांभीर्याने व्हावी,अशीही मागणी यावेळी करण्यात आली.