आजपासून आरक्षणास प्रारंभ
मडगाव : एकूण 18 डबे असलेली मडगाव ते मुंबई एकतर्फी स्पेशल रेल्वे सोडण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे. 01592 क्रमांकाची मडगाव -मुंबई ही एकतर्फी रेल्वे रविवारी 24 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 वाजता मडगाव रेल्वे स्थानकावरुन सुटेल. ही रेल्वे रात्री 11 वाजण्याच्या सुमाराला मुंबई (सीएसएमटी) येथे पोचेल. करमळी थिवी, मडुरे, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधदुर्ग, कणकवली नंदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडावली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, आरावली रोड, सावर्डे, चिपळूण खेड, माणगाव, रोहा, पनवेले ठाणे व दादर या रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबेल. आज 22 सप्टेंबरपासून या रेल्वेसाठी आरक्षण सुरु होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.