किंमत 12.74 लाख रुपये राहणार असल्याचे संकेत
नवी दिल्ली
मारुती सुझुकीने भारतीय बाजारात जिम्नी एसयूव्ही सादर केली असून जिची प्रारंभीची किंमत 12.74 लाख रुपये (एक्सशोरुम) राहणार असल्याची माहिती आहे. कारच्या
टॉप मॉडेलची किंमत 15.05 लाख
रुपये असणार आहे. मारुती सुझुकी जिम्नीची महिंद्रा थार एसयूव्हीशी टक्कर असणार आहे. याशिवाय फोर व्हिल ड्राईव्ह सेगमेंट फोर्स गुरखा यांच्यामध्ये स्पर्धा राहणार आहे.
ऑटो एक्स्पो 2023 मध्ये 12 जानेवारी रोजी मारुतीची जिम्नी पहिल्यांदा बार इंडिया मार्केटमध्ये 7 रंगाच्या पर्यायासह आणि अल्फा जीटा 2 मॉडेलसोबत सादर करण्यात आली. तसेच जिम्नी इंटरनेट मार्केटमध्ये काही वर्षापासून उपलब्ध आहे. जिम्नीचे मायलेज 16 ते 19 किलोमीटर प्रति लिटर राहणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. भारतामध्ये जिम्नीचे 4 व्हील ड्राईव्ह आणि 5 डोर व्हर्जन
सादर करण्यात आले आहे. एसयूव्हीमध्ये 1.5 लिटर 4 सिलेंडरच्या आवृत्तीसह नैसर्गिक एस्पिरेटेड इंजिन तयार केले आहे.