तिवरे वरगांव ग्रामसभेत बेकायदेशीर मटका विषयावर चर्चा : पंचायतीचे कामकाज मराठीतून करण्याची मागणी
वार्ताहर /माशेल
पंचायतीतील दुकाने भाडेपट्टीवर देताना नियमांचे उल्लघन झालेले आहे. पंचायत क्षेत्रात दुकाने मटकावाल्याना भाडेपट्टीवर देऊन सर्रास बेकायदेशीर कृत्यांना हातभार लावत असल्याचा कारणावर तिवरे वरगांव पंचायतीची ग्रामसभा गाजली. सरपंच जयेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा काल रविवारी पार पडली. पंचायतीच्या दुकानांना अल्प भाडे हा विषय प्रत्येक ग्रामसभेत गाजत असतानाही आजपर्यत त्या दुकानाचे भाडे वाढविण्यात न आल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. यावर उत्तर देताना सरपंच जयेश नाईक म्हणाले की वकिलांचा भाडेपट्टीसंबंधी सल्ला घेतला असता वकिलांनी दुकानांचा लिलाव करू नका असा सल्ला दिला आहे, त्याचप्रमाणे दुकानदार 35 वर्षे दुकान चालवित आहेत. परंतू त्यांचा पंचायतीकडे कुठलाच करार शाबूत नसल्याची कबूली यावेळी देण्यात आले. बेकायदेशीरपणे व्यवसाय थाटणाऱ्याविरोधात पंचायतीने कडक कारवाई करण्याची मागणी प्रसाद गावकर यांनी केली. बेसुमार मटका व्यवसायासाठी भाडेपट्टीवर दिलेली आढळलेली आहे त्यावर स्थानिकांनी तीव्र आक्षेप घेत हाच तो स्वयंरोजगाराचा मार्ग का असा संतप्त सवाल उपस्थित केला.
शेतात उभारलेल्या घरांवर कारवाईचे संकेत
तिवरे येथे शेतात दुसऱ्याच्या जागेत बांधलेल्या तीन घरांवर कारवाई करण्यात दिरंगाईचे धोरण यावर सरपंचानी त्याविषयी ‘ओकुपन्सी’ दाखला दिली जाणार नसून कायदेशीर बाबींचा विचार केल्यानंतरच निर्णय घेण्यात येईल. तिवरे येथे काजूंच्या झाडांना आग लागल्याले झाडांविषयी आथि&िक सहाय्य देण्यात आलेल्या बागायतदाराच्या नावाविषयी आक्षेप घेण्यात आला. माशेल भागात दुकानातून प्लास्टिक पिशव्याची विक्रीप्रकरणी पंचायतीने कारवाई करण्याचे यावेळी सुचित करण्यात आले. ‘नो डेव्हलपमेंट झोन’ वर बांधकाम होत असल्याचे नागरिकांनी दृष्टीस आणून दिले तर त्यावार कारवाई करण्याचे सांगितले.
पंचायतीचे कामकाज मराठीतून करण्याची मागणी
ग्रामिण भागातील जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडून ते सोपस्कररित्या ग्रामिण भागातील नागरिकांना समजून घेता यावे, तसेच त्यावर आपली प्रतिप्रश्न मांडणे सोपे होण्यासाठी पंचायतीने ग्रामसभेचे कामकाज मराठीतून व्हावे अशी मागण करण्यात आली. पंचायतीतर्फे ‘व्हीडीसी’ समितीची निवड करण्यात आली असून समितीच्या कामासंबंधी त्याचप्रमाणे व्हीडीसी मंडळ सभेला का उपस्थित नाही असा सवाल उपस्थित केला. सरपंचानी समितीचे जे सदस्य येत नाही त्याच्याजागी नवी सदस्य व्हीडीसी समितीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी गटारावर गरमागरम चर्चा झाली. प्रत्येक पंचसदस्यांनी आपआपली गटारे उपसली असल्याचे सांगून पंचायतीतर्फे देण्यात येणारे 15 हजार रूपये वाढवून देण्याची मागणी केली. परंतू काही गटारे अर्धवट असल्याचे भरत जल्मी यांनी निदर्शनास आणून दिली. काही गटारांची चुकीची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. सचिवाने याकडे लक्ष घालावे त्याचप्रमाणे रस्त्यावरची वाढलेली झाडे कापतात तेव्हा त्याच्याप्रमाणे फोटो उपलब्ध करावा अशी मागणी केली. पंचायत क्षेत्रात मोठया प्रमाणात बिगरगोमंतकीयाचा समावेश असून त्याची सविस्तर माहिती पोलीस कार्ड करून घेण्यासांबंधी यावेळी सुचविण्यात आले. फुटपाथ अडविणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई करावी. तसेच बेकायदेशीर व्यवसाय परवाना नसलेल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. सरपंचानी त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मंगेश गावकर, शेखर गावकर व इतर नागरिकांनी चर्चेत सहभाग घेतला. सरपंच नमेश नाईक यांनी स्वागत केले. सचिवांनी इतिवृत्तांत वाचून कायम केला. उपसरपंच सुमित्रा नाईक व सहा पंचसदस्य उपस्थित होते.