वार्ताहर /माशेल
बाणस्तारी येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेला चतुर्थीचा माटोळी बाजार यंदा 28 व 29 ऑगस्ट रोजी भरविण्यात येणार आहे. भोम अडकोण पंचायतीचे सरपंच दामोदर नाईक यांनी ही माहिती दिली.
बाणस्तारी येथील श्री मारुती मंदिरच्या परिसरात जेथे साप्ताहिक बाजार भरतो त्याच ठिकाणी हा माटोळी बाजार भरणार आहे. पुढच्या वर्षी नवीन बाजार प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याठिकाणी हा बाजार भरविण्यात येईल. प्रत्येक व्यापाऱयाला सोपो दर नियोजित करण्यात आले असून त्यानुसारच सोपो कर आकारण्यात येणार आहे. नियोजित दरापेक्षा अतिरिक्त पैसे आकारल्यास व्यापाऱयांनी पंचायत कार्यालयात तक्रार करावी, असे त्यांनी सांगितले. बाजार काळात पार्किंग व वाहतुकीमध्ये शिस्त राहावी यासाठी वाहतूक पोलीस तैनात करण्यात येतील, अशी माहिती दामोदर नाईक यांनी दिली.