ओटवणे / प्रतिनिधी-
गणेशोत्सवानिमित ओटवणे कलाकार आयोजित ऑनलाईन अभंग गायन स्पर्धेत मयूर विठ्ठल गावकर याने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक तन्वी आत्माराम चिले हिने तर तृतीय क्रमांक शांताराम शृंगारे यांनी पटकाविला. या स्पर्धेत उत्तेजनार्थ म्हणून स्वप्निल म्हापसेकर आणि नाना चिले यांची निवड करण्यात आली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धा आयोजन प्रमुख जयगणेश गावकर, मंगेश गावकर, शांताराम शृंगारे, रामदास, बाबाजी गावकर आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.