मुंबई
शिपबिल्डिंग क्षेत्रातील कंपनी माझगाव डॉकचा समभाग सलग आठव्या दिवशी बाजारात वधारताना दिसला आहे. समभाग गेल्या दोन दिवसात 27 टक्के इतका वाढला आहे. बीएसईवर मंगळवारी इंट्रा डे दरम्यान 8 टक्के वाढत 1062 रुपयांवर कंपनीचा समभाग पोहचला होता. गेल्या 8 दिवसांचा विचार केल्यास कंपनीचा समभाग 41 टक्के इतका वाढला आहे. पहिल्या 15 मिनीटात बाजारात 49 लाख समभागांचे व्यवहार झाल्याची माहिती आहे.