किमत 5 कोटी
नवी दिल्ली
: लक्झरी कार खरेदी करणाऱ्यांची भारतात कमी नाही. हे पाहूनच लक्झरी कारच्या श्रेणीमध्ये भारतामध्ये आणखी एका कंपनीने आपली नवी कार नुकतीच दिमाखात उतरवली आहे. अर्टुरा असे तिचे नाव आहे. मॅकलेरेन ऑटोमोटीव्ह यांनी आपली नवी स्पोर्ट्स लक्झरी कार अर्टुरा भारतात लाँच केली आहे. या अलीशान अशा हायब्रिड स्पोर्ट्स कारची किंमत तब्बल पाच कोटी रुपये इतकी असणार असल्याचे समजते. यामध्ये 2993 सीसीचे ट्वीन टर्बोचार्जड व्ही 6 पेट्रोल इंजिन असणार असून याशिवाय लिथियम आयन बॅटरीचा समावेश देखील करण्यात आला आहे. आठ स्पीड ट्रान्समिशनची जोड यात असेल.