सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे उपक्रम
सावंतवाडी : प्रतिनिधी
स्वच्छ भारत अभियान २ अंतर्गत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा अंतर्गत सावंतवाडी नगर परिषदेतर्फे स्वच्छता ही सेवा व स्वच्छता पंधरवडा दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये सफाई मित्र सुरक्षा शिबिर याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये सफाई मित्रांची वैद्यकीय तपासणी करून घेण्यात येत आहे. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांचेमार्फत ही तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये सीबीसी, एचआयव्ही ,ईसीजी तसेच जॉईंट पेन असल्यास त्यावर ट्रीटमेंट तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासण्या करण्यात येणार आहेत. याकरिता वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवाळे यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. सागर जाधव व डॉ . चिन्मय पिशवीकर, डॉ. अमरापूरकर हे वैद्यकीय तपासणी करीत आहेत. सदर शिबिराचे आयोजन दिनांक 26 सप्टेंबर ,27 सप्टेंबर 2023 या दोन दिवसात करण्यात आले आहे. याकरिता व प्रशासक प्रशांत पानवेकर व मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय . सफाई मित्र सुरक्षा शिबिर अंतर्गत सर्व कामगारांना सुरक्षा रक्षक उपकरणे (पीपीई) यांचा पुरवठा करण्यात येणार असून कामगारांचा सुरक्षा विमा देखील काढण्यात येणार आहे , तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ कामगारांना देण्यात येणार आहे.