भारतात खिचडी, अमेरिकेत पिझ्झा कंफर्ट फूड
तुम्ही कुठल्याही देशाचे, जातीचे किंवा धर्माचे असा, कंफर्ट फूड खाल्ल्याने मिळणारा अनुभव नेहमीच एकसारखाच असतो. म्हणजेच तुमच्या मनाला शांतता मिळत असते. प्रत्येक देशात संस्कृती आणि वातावरणाच्या आधारावर स्वतःचे वेगळय़ा प्रकारचे कंफर्ट फूड असते.
जीवनात जेव्हा मोठी उलथापालथ सुरू असते तेव्हा लोक पूर्वीच कधीच न खाल्लेले खाद्यपदार्थ खाणे पसंत करतात असे साउथ कॅरोलिना युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनात आढळून आले आहे. जीवनात अधिक स्थिरता असल्यास लोक लोकप्रिय ब्रँडचे भोजन खाणे पसंत करतात, यामुळे नव्या शक्यता शोधण्यासही मदत मिळत असल्याचे टाइम्स ऑफ चेंजच्या एका अध्ययनात आढळून आले आहे.
उत्तर अमेरिकेत कंफर्ट फूडच्या स्वरुपात पिझ्झा सर्वाधिक खाल्ला जातो. पुरुष आनंदाच्या वातावरणात कंफर्ट फूड अधिक खाणे पसंत करतात. तर महिला तणावात कंफर्ट फूडला प्राधान्य देतात. यानंतर त्यांच्यात दोषीपणाची भावना निर्माण होत असते. भारतात कंफर्ट फूड म्हणून लोक सर्वाधिक खिचडी खाणे पसंत करत असल्याचे अध्ययनात दिसून आले.
कंफर्ट फूड खाल्ल्याने लोक नातेसंबंध जुळल्याची अनुभूती करतात. त्यांच्यात आपलेपणाची भावना वाढते. अमेरिकेत कंफर्ट फूड खाल्ल्याने लोकांमध्sय सुरक्षितपणाची भावना तयार होते, परंतु याचे प्रभाव हे भूतकाळावरही निर्भर असतात असे अध्ययनानंतर म्हटले गेले आहे.