दिवाळीची सुरुवात झाली की थंडीला देखील सुरुवात होते. या दिवसात स्किन खूप कोरडी पडायला लागते. म्हणूनच दिवाळीत शरीराराल उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. मात्र हे उटणे किंवा अभ्यंगस्नान योग्य पध्दतीने केले नाही तर फायदा देखील होत नाही. म्हणूनच उटणे लावण्याची पारंपारीक पध्दत कोणती हे आज आपण जाणून घेणार आहोत.
साहित्य
सुगंधी उटणे
तिळाचे कुट
ज्वारीच पीठ
गरम पाणी
सुरुवातीला थोडे उटणे आणि गरम पाणी घ्या.हे मिश्रण चांगले मिक्स करून दोन्ही हाताला आणि पायाला चोळून लावा. आता यानंतर 10 मिनिट थोडे वाळू द्या. त्यानंतर थोडे ज्वारीचे पीठ आणि तिळाचे कुट घ्या. दोन्ही मिश्रण एकत्र करून उटणे लावलेल्या भागाला हाताने हळूवार चोळून घ्या. यानंतर हातावरील उटणे निघण्यास सुरुवात होईल. यामुळे हातावरील टॅनिंग कमी होण्यास मदत होईल. तसेच त्वचा सुंदर दिसण्यास सुरुवात होईल. यानंतर पुन्हा ज्वारीचे पीठ, तिळाचे कुट आणि गरम पाणी मिक्स करून लावा. पुन्हा हा लेप हाताला लावा आणि कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. यानंतर साबण किंवा बाॅडीवाॅशचा वापर करू नका.