प्रतिनिधी/ म्हसवड
आरोग्याची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱया म्हसवड शहरात लहान-मोठे अनेक दवाखाने आहेत. एक महिन्याच्या अंदाजाचे मुलीच्या जातीचे अभ्रक म्हसवड- शिंगणापूर रस्त्यालगत असलेल्या काटेरी झुडुपात आढळले आहे. हे नवजात अर्भक टाकून संबधित पसार झाला. त्यामुळे संबंधितांना अटक करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान या लहान मुलाच्या रडण्याच्या आवाजाकडे जाणाऱया-येणाऱया लोकांचे लक्ष गेल्यावर लोकांनी पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली. त्या नवजात अर्भकास प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी ठेवण्यात आले असून पोलीस सदर प्रकरणाचा अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेने पुन्हा एकदा म्हसवड हादरुन गेले असून सदर अभ्रक टाकणाऱयाचा तपास लवकरात लवकर पोलिसानी करून आरोपीला अटक करण्याची मागणी होत आहे.
दि. 29 रोजी दुपारी 4 ते 4.30 च्या दरम्यान शिंगणापूर चौकापासून 200 मिटर अंतरावर एका दुकानाच्या पाठीमागील बाजूस वेडीबाबळंच्या झुडपात लहान बाळ कंबळमध्ये गुंडाळून टाकण्यात आले होते. या रोडने जाणाऱया-येणाऱया लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन संबंधित अभ्रकास येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. रात्री उशिरा सातारा येथे नेण्यात आले. दरम्यान या घटनेचा पंचनामा रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
माता की वैरीण
वंशाचा दिवा पाहिजे म्हणून मुलीला जन्माच्या आधीच संपवण्यासाठी ज्याना आपन आज देव म्हणतो ते आज पैशापुढे राक्षस झाले आहेत. त्यामुळे मुलगी जन्माला यायच्या आधीच तिला मारुन टाकण्याचे प्रकार राजरोस सुरू आहेत. त्यातीलच हा प्रकार असून मुलगी नको घराला वारस म्हणून मुलगा पाहिजे म्हणून नवजात मुलीचे अभ्रक टाकून देण्यात आले किंवा या अनैतिक संबधाने घडलेल्या या प्रकाराला लपवण्यासाठी हा प्रकार घडला आहे.
माहिती देणाऱयांचे नाव गोपनीय ठेवले जाईल –
स.पो.नि.राजकुमार भुजबळ
सदरचे कृत्य हे नक्कीच माणुसकीला काळीमा फासणारे आहे, त्यामुळे असे कृत्य करणाऱयाचा आम्ही शोध घेण्याचे काम सुरू आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करुन आरोपीला अटक करण्यात येईल. दरम्यान याबाबत जर कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधावा, त्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन करण्यात आले आहे.