प्रतिनिधी /पणजी
रुआ दि ओरेमखाडी परिसरातील मेरी इमाकुलेट गल्स हायस्कूलच्या फुटपाथवरील जलवाहीनी फुटल्यामुळे लाखो लिटरचे पाणी नासाडी झाली. संध्याकाळी कोर्तीन, पाटो परिसराला पाणी मिळाले नाही. सोमवारी सकाळीही नळातून पाणी मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगण्यात आले.
पणजी शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर खोदाई करून मल निस्सारण पाईप लाईन टाकण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. गेले काही दिवसापूर्वी भाटले परिसरात अशीच जलवाहिनी फुटल्याने पाणी लोकांच्या घरात घुसले होते व ती पाईपलाईन दुरूस्त करीपर्यंत भाटले मार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवल्याने वाहतूकीची बरीच कोंडी झाली होती. आता ही दुसरी जलवाहिनी फुटल्याने इतर परिसरातही हीच परिस्थिती निर्माण होईल काय? असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंताना पडला आहे.