काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा काँग्रेस पक्षाच्या अधिकृत पेजवर उल्लेख
सांगली / प्रतिनिधी
एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ महेशकुमार कांबळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. या संबंधीचे निवेदन मिरजेचे पोलीस उपधीक्षक अशोक वीरकर यांना देण्यात आले आहे.
इस्लामपूर शहरात काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीचे शाकिर तांबोळी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्याबरोबरच एमआयएमचे इस्लामपूर शहर अध्यक्ष एजाज मुजावर आणि तालुका अध्यक्ष जाकीर मुजावर हेसुद्धा पक्षात प्रवेश करत असल्याचा फोटो काँग्रेस पक्षाच्या अधिकृत पेजवर व्हायरल झाले होते. या पोस्टवर केलेल्या फोटोमधील व्यक्तीचा एम.आय.एम. पक्षाशी काही संबंध नसताना त्यांना पक्षाचे पदाधिकारी म्हणून एमआयएम पक्षाची बदनामी केली आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. हे निवेदन पोलीस उपधीक्षक अशोक वीरकर आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी स्विकारले.