प्रत्येक विवाहित जोडप्याला मूल हवे असते. तथापि, मूल होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून ती विशिष्ट वयातच घडावी लागते. महिलांच्या रजोनिवृत्तीनंतर त्यांचे माता बनणे अशक्मय असते. तर पुरुषांमध्येही विशिष्ट वयानंतर मूल होण्याची क्षमता राहात नाही. तथापि, 24 वषीय पत्नी मिरॅकल पोग यांना त्यांच्या 85 वषीय पती चार्ल्सकडून मूल व्हावे, अशी इच्छा आहे. त्यासाठी त्या प्रयत्नही करीत आहेत.
2019 मध्ये मिरॅकल यांचा चार्ल्स यांच्याशी विवाह झाला. दोघेही ज्या ठिकाणी काम करत होते, तेथे ओळख झाल्यानंतर त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला. त्यावेळी त्या 20 वर्षांच्या तर चार्ल्स 81 वर्षांचे होते. प्रेमाच्या भरात त्यांना मूल होण्यात अडचण येईल, हा मुद्दा सुचला नाही. चार्ल्स यांचे वय झाले असले तरी ते मूल होण्यासाठी फिट आहेत, अशी मिरॅकल यांची समजूत आहे.
मिरॅकल यांचे चार्ल्स यांच्यावर निरतिशय प्रेम आहे. मूल होण्यात अडचण येणार याची जाणीव असूनही त्याच्यापासून विभक्त होण्याचा पत्नीचा विचार नाही. लग्न झाले तेव्हा त्यांनी पतीची जन्मतारीखही विचारली नव्हती. चार्ल्स यांनाही मुलाला जन्म देण्याची अतीव इच्छा आहे. आम्हाला नवी पिढी निर्माण करायची आहे, असे ते सांगतात. तथापि, दोघांचीही इच्छा असूनही वयाचा अडसर कसा दूर करणार? हा प्रश्न असून आता ते डॉक्टरांसमोरचे आव्हान आहे. सर्वप्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. डॉक्टरही विविध औषधांचे प्रयोग करीत आहेत. त्यांना यश यावे, अशी त्यांच्या कुटुंबियांची आणि मित्रपरिवाराचीही इच्छा आहे.