वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून तत्वत : मान्यता, सिव्हीलमधील सुविधांचा घेतला आढावा
मिरज प्रतिनिधी
मिरज शासकीय वैद्यकीय ऊग्णालयात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासह विद्यार्थी वसतीगृह बांधकामासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. कामाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी सिव्हील प्रशासनाने सर्व कार्यवाही पूर्ण कऊन प्रस्ताव द्यावा, अशा सुचनाही केल्या. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून गरिबांचा दवाखाना, अशी ओळख असलेल्या सिव्हीलमध्ये गोरगरीब ऊग्णांना अनेक चांगल्या सुविधा उपलब्ध कऊन देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील इमारत बांधकाम व अन्य सोयी-सुविधांबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या दालनात आढावा बैठक झाली. यावेळी कामगारमंत्री सुरेश खाडे, खा. संजय पाटील, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी, राजीव निवतकर, डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, कार्यकारी अभियंता कीर्तीकुमार मिरजकर, डॉ. रूपेश शिंदे उपस्थित होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ऊग्णालयात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल बांधणे व विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची इमारत बांधकाम करण्यासंदर्भात तत्वत: मान्यता देण्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. तसेच हा प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्यात येईल, असेही सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी एकूण 13 अभ्यासक्रम राबविण्याबद्दल चर्चा करण्यात आली. या प्रस्तावांतर्गत बांधकामासाठी आकारलेले दर तपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा सादर करण्याबाबत तसेच अल्पसंख्याक विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळवण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या. तसेच, पॅरामेडिकल सायन्स योजना अंतर्गत महाविद्यालयाच्या बांधकामासाठीचा प्रस्ताव पुन्हा सादर करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय ऊग्णालय, सांगली येथे पाचशे खाटांचे नवीन ऊग्णालय, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तसेच शवागृह आदी बाबींसाठी दोन महिन्यांच्या आत आवश्यक कार्यवाही कऊन निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्या. सिव्हीलमध्ये भारतीय परिचर्या परिषदेच्या मानकांनुसार पुरेसा नर्सिंग स्टाफ नसल्यामुळे विविध आजारांवर उपचार करताना अपुरे मनुष्यबळ व साधने यांच्या मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर शंभर प्रवेश क्षमतेचे बी.एस्सी नर्सिंग महाविद्यालय सुऊ करण्याच्या विषयावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
सुपरस्पेशालिटीमुळे काय मिळतील सुविधा?
मिरज शासकीय वैद्यकीय ऊग्णालय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल झाले तर येथे अनेक प्रकारच्या अत्याधुनिक सुविधांसह कुशल मनुष्यबळ आणि उच्च दर्जाची अतिरीक्त यंत्रसामुग्री उपलब्ध होईल. दोनशे खाटांचे ऊग्णालय बांधकाम तसेच पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, अध्यापक व इतर मनुष्यबळ, यंत्र सामुग्री व साधन सामुग्री यांचा अंतरभाव असेल. मिरज शहराला वैद्यकीय पंढरी संबोधले जाते. याच शहरात शासनाचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झाल्यास गरीब ऊग्णांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावून उपचार करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे हे हॉस्पिटल विशेष कऊन गरीबांसाठी मोठा आधार ठरेल.