मिरज/प्रतिनिधी
ऐतिहासिक असणारी सांगली जिल्ह्यातील मिरजेची गणेश विसर्जन मिरवणूक यंदा २५ तास चालली. मिरज शहरात २५० सार्वजनीक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तींच विसर्जन करण्यात आलं. या मिरवणुकीत अनेक राज्यातील हजारो गणेशभक्त सहभागी झाले होते. मिरज येथील गणेश तलाव येथे सर्वात शेवटी मिरज शहर पोलिसांच्या गणेश मूर्तींच विसर्जन करून मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि पोलिसांनी मिरवणुकीत डीजेच्या तालावर ठेका धरला. यावेळी जल्लोषी वातावरणात पोलिसांनी मनसोक्त नृत्य केलं.
हे ही वाचा : जे जे चांगले..ते ते कोल्हापुरी
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शांतता आणि सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी फार परिश्रम घेतले होते. या मिरवणुका शांततेत पार पडल्या. दरम्यान सांगली जिल्ह्यात एकूण अडीज हजार सार्वजनीक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तींच विसर्जन करण्यात आलं. कोरोनामुळे मागील दोन वर्ष मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला गेला नव्हता. मात्र यंदा मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यात आला.