वैद्यकीय साधने पुरविल्याने रुग्णांसाठी मोठा दिलासा
वार्ताहर /लाटंबार्से
काही लोक लघू उद्योग सुरू करताना आर्थिक नियोजन करण्यासाठी कर्ज देणारी बँक सुरू करतात. मात्र डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो हे स्वत: वैद्यकीय क्षेत्रात असल्याने त्यांनी एक नवा वैद्यकीय उपक्रम सुरू केला. यामार्फत गरजवंताना वैद्यकीय साधनसुविधा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने ‘वैद्यकीय बँक’ सुरू केली आहे. या वैद्यकीय बँकेच्या माध्यमातून ते आजारी ऊग्णांना व्हील खुर्च्या, वैद्यकीय बेड, ऑक्सिजन, वॉकर, वॉकिंग स्टिक या वैद्यकीय सामुग्री गरजवंतांना घेण्यासाठी परवडत नाही ते बँकेच्या माध्यमातून देत असून ऊग्ण बरा झाल्यानंतर त्याने ती परत या बँकेत जमा करावी. आतापर्यंत अनेक ऊग्णांनी या सेवेचा लाभ घेतला असून वैद्यकीय बँक सुरू करणारा आतापर्यंत हा पहिलाच आमदार असून. या वैद्यकीय उपक्रमाची घोषणा त्यांनी आपला वाढदिवस साजरा करतेवेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या समोर केली होती. आतापर्यंत या माध्यमातून किती तरी ऊग्णांनी या सेवेचा लाभ मिळवलेला आहे.
ऊग्णांना या सेवेचा होतो लाभ
आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो हे वैद्यकीय शेत्रात गेल्या कित्येक वर्षापासून असून ते मोती बिंदूवर शस्त्रक्रिया करणारे आघाडीचे प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर आहेत. करासवाडा, म्हापसा येथील त्यांच्या खासगी व्हिजन हॉस्पिटलात दररोज अनेक ऊग्णांवर मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया केली जाते. तसेच इतर अनेक वैद्यकीय सेवा या इस्पितळात पुरवली जात आहे. तळागाळातील लोक या इस्पितळात येऊन मोतीबिंदूवर शस्त्रक्रिया करून घेतात. त्याचबरोबर ऊग्णांसाठी मोफत शिबिरे आयोजित करून त्या शिबिराच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून रुग्णांना नवीन दृष्टी दिली आहे. कोरोना काळात ऑक्सीजनअभावी अनेक ऊग्ण दगावले गेले. तो काळ लक्षात घेऊन घरीही हे ऊग्ण या सेवेचा वापर करू शकतात. ऊग्ण बरा झाला की ती वस्तू परत वैद्यकीय बँकेत आणून द्यावी, असा हा उपक्रम आहे.
ऊग्णसेवा ही ईश्वरसेवा!
आज माझ्या मतदारसंघात दुर्बल घटकातील अनेक ऊग्ण असून अशा ऊग्णांसाठी ऑक्सिजन किंवा व्हील खुर्च्या, वॉकर किंवा वैद्यकीय बेड घेण्यासाठी आर्थिक चणचण किंवा परवडत नाही अशांसाठी ही वैद्यकीय बँक असून याच्या माध्यमातून गरजवंताला सेवा पुरविण्याचे काम करीत आहे. ऊग्णांना सेवा पुरविणे हे मोठे काम असून ऊग्णसेवा ही मोठी सेवा असल्याने ऊग्णांनी या सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांनी केले.