ऑनलाईन टीम/तरुण भारत
भाजप नेते आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ठाणे सत्र न्यायलयाने (District & Sessions Court, Thane) गणेश नाईक यांना मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने नाईक यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. गणेश नाईक यांच्यावर दीपा चौहान (deepac houhan) या महिलेने अत्याचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे गणेश नाईक यांच्याविरोधात बेलापूर आणि नेरूळ येथील पोलीस ठाण्यात बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी गणेश नाईक यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तसेच धमकविल्या प्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी भाजप आमदार गणेश नाईक यांनी ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. याप्रकरणी बुधवारी न्यायमूर्ती एन.के. ब्रम्हे यांच्यासमोर सुनावणी होणार होती. मात्र या प्रकरणात दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आज सत्र न्यायलयाने निकाल सुनावला. न्यायालयाने दोन्ही गुन्ह्यात गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे गणेश नाईकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.