बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काल सोमवारी सहपरिवार तुमकूर येथील श्री सिद्धगंगा मठाला भेट देऊन श्रीश्रीश्री शिवकुमार महास्वामीजींच्या स्मारकाचे दर्शन घेतले.
त्यानंतर श्री सिद्धगंगामठाचे विद्यमान स्वामीजी श्रीश्री सिद्धलिंग यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेतले. यासंदर्भात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या राज्यातील जनतेची आणि काँग्रेस सरकारच्या भविष्यासाठी मी प्रार्थना केली असून, या मठात येऊन मी कृतार्थ झाले आहे. सर्वांचे कल्याण होवो हीच प्रार्थना.