बेळगाव : रामतीर्थ नगर येथे आज आरटी नगर आणि ऑटो नगर येथील नागरिक आणि विविध संघटनांनी बेळगाव उत्तर मतदारसंघातील आमदार राजू यांचा सत्कार केला.
आमदार राजू सेठ यांनी यावेळी परिसरातील सद्यस्थितीबद्दल नागरिकांशी चर्चा केली. असोसिएशकडून अनेक समस्या व अर्धवट कामांबाबत निवेदन दिले आहे. ही कामे आणि संशय मार्गी लावण्यासाठी पुन्हा अधिकाऱ्यांसोबत घेऊन या भागाची पाहणी करण्यात येईल, असे आश्वासन राजू सेठ यांनी दिले.
यावेळी परिसरातील नागरिक व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते .