ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काल कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी मनसेकडे जाणते नेतृत्व नाही. 15-20 वर्षांपूर्वीच व्हिडिओ काढून लाव रे तो व्हिडीओ’ म्हणणं उर्मटपणा आहे. उर्मटपणाला नेतृत्व म्हणत नाहीत, अशी जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली होती. त्याला आता मनसेने जशाच तसे उत्तर दिले आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी अंधारेंच्या जुना व्हिडिओ ट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला.
काळे यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये अंधारे या बाळासाहेब ठाकरेंवर टीका करताना दिसत आहेत. याच व्हिडीओचा आधार घेत गजानन काळे यांनी अंधारेंना लक्ष्य केले आहे. काळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘80-85 वर्षांच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार देऊन काय उपयोग आहे. हात थरथर करायला लागले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असे विधान करणे याला उर्मटपणा म्हणतात. महाढोंगी यात्रेत राजसाहेबांच्या ‘लावरे तो व्हिडिओ’ला उर्मटपणा म्हणण्याअगोदर राजकारणातील अलका कुबल यांनी हा व्हिडिओ बघावा,’
अधिक वाचा : नासाच्या ‘आर्टेमिस-1’ चे यशस्वी प्रक्षेपण, 25 दिवसांनी परतणार पृथ्वीवर