आशियातील सर्वात मोठे कन्व्हेंशन अन् एक्स्पो सेंटर : मेट्रोमधून पोहोचले पंतप्रधान : कामगारांशी साधला संवाद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी म्हणजेच स्वत:च्या जन्मदिनी इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेंशन आणि एक्स्पो सेंटर ‘यशोभूमी’ (आयआयसीसी)च्या पहिल्या भागाचे उद्घाटन केले आहे. दिल्लीतील द्वारका येथे निर्मित हे जगातील सर्वात मोठे एमआयसीई (मीटिंग्स, इंसेंटिव्ह, कॉन्फरन्स अँड एक्झिबिशन) सेंटर आहे.
तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी द्वारका सेक्टर-21 पासून यशोभूमि द्वारका सेक्टर-25 पर्यंत निर्मित एअरपोर्ट एक्स्प्रेस लाइन (मेट्रो मार्ग)च्या विस्ताराचे उद्घाटन केले. नवे यशोभूमि द्वारका सेक्टर-25 भूमिगत स्थानक असून ते थेट शहराच्या आवश्यक ठिकाणांशी म्हणजेच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानाचे टर्मिनल 3 आणि दिल्ली रेल्वेस्थानकाशी जोडलेले असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी 17 सप्टेंबर रोजी मेट्रोमधून प्रवास केला. यादरम्यान त्यांनी लोकांशी संवाद साधला आहे. तर लोकांनी पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी काढून घेतली आहे. पंतप्रधान मेट्रोमधून प्रवास करत कन्व्हेंशन सेंटरच्या ठिकाणी पोहोचले. येथे त्यांनी पारंपरिक काम करणाऱ्या कामगारांशी भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. हे कन्व्हेंशन सेंटर भारत मंडपमपेक्षाही मोठे आहे. भारत मंडपम पेथे 9-10 सप्टेंबर रोजी जी-20 ची बैठक पार पडली होती.
नवा भारत कॉन्फरन्स टूरिझमसाठी स्वत:ला तयार करत आहे. अॅडव्हेंचर, मेडिकल, स्पिरिच्युअल अणि हेरिटेज टूरिझम आवश्यक वातावरण असलेल्या ठिकाणीच होते. अशाचप्रकारे कॉन्फरन्स टूरिझम देखील इव्हेंट आणि मीटिंगची सुविधा असलेल्या ठिकाणीच होणार आहे. भारत मंडपम आणि यशोभूमि दिल्लीला संमेलन पर्यटनाचे सर्वात मोठे केंद्र म्हणून ओळख मिळवून देऊ. जगात दरवर्षी 32 हजारांहून अधिक मोठी प्रदर्शने आणि एक्स्पो आयोजित होत असतात. 2-5 कोटी लोकसंख्या असलेले देश याची व्यवस्था करतात, आमची लोकसंख्या तर 140 कोटी आहे, कॉन्फरन्स टूरिझमसाठी येणारे लोक सामान्य पर्यटकांपेक्षा अधिक पैसे खर्च करतात. या उद्योगात भारताची भागीदारी केवळ 1 टक्के असल्याचे उद्गार पंतप्रधान मोदींनी काढले आहेत.
यशोभूमि 2019 एकरमध्ये सुमारे 5400 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आली आहे. तर प्रगती मैदानातील भारत मंडपम 123 एकरमध्ये उभारण्यात आले आहे. कन्व्हेंशन सेंटरमध्ये निर्माण करण्यात आलेल्या अंडरग्राउंड पार्किंगमध्ये एकाचवेळी 3 हजार कार्स पार्क केल्या जाऊ शकतात. या सेंटरमध्ये ड्रेनेज वॉटरचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. तसेच रेनवॉटर हार्वेस्टिंगची सुविधा देखील यात आहे. यशोभूमिमध्ये दरवर्षी 100 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सोहळ्यांचे आयोजन करविण्याचे लक्ष्य आहे. यातून प्रत्यक्ष अन् अप्रत्यक्ष स्वरुपात 5 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे.
यशोभूमी कन्व्हेंशन सेंटरची वैशिष्ट्यो..
-कन्व्हेंशन सेंटरमध्ये 11 हजारांहून अधिक लोकांना सामावून घेण्याची क्षमता आहे.
-यात 15 कन्व्हेंशन रुम्स, ग्रँड बॉलरुम आणि 13 मीटिंग रुम्स तयार करण्यात आल्या आहेत.
-कन्व्हेंशन सेंटरचा प्लेनरी हॉल व्हिजिटरला जागतिक स्तराचा अनुभव मिळवून देणार आहे.
-सरकारने सुमारे 5400 कोटी रुपये खर्च करून यशोभूमि प्रकल्प निर्माण केला आहे.
-यशोभूमि हा प्रकल्प 219 एकरपेक्षा अधिक क्षेत्रात फैलावलेला आहे.
-या प्रकल्पात देशातील सर्वात मोठी एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार आहे.