वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 व्या आशियाई 20 वर्षांखालील अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी बजावलेल्या अपवादात्मक कामगिरीबद्दल कौतुक केले आहे. 4 ते 7 जूनदरम्यान कोरिया प्रजासत्ताकच्या येचिओन येथे झालेल्या सदर स्पधेंत भारतीय खेळाडूंनी 19 पदके जिंकली.
‘आमच्या खेळाडूंचा अभिमान वाटतो ! त्यांनी 20 व्या आशियाई 20 वर्षांखालील अॅथलेटिक्स स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली ! 6 सुवर्णांसह 19 पदके मिळवून भारताने 45 राष्ट्रांमध्ये तिसरे स्थान पटकावले. आम्ही आमच्या खेळाडूंच्या विजयाचा आनंद साजरा करतो आणि त्यांच्या भावी प्रयत्नांसाठी त्यांना शुभेच्छा देतो’, असे ट्विटरवर पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे. जपानने 23 पदकांसह (14 सुवर्ण, 4 रौप्य आणि 5 कांस्य) या स्पर्धेच्या पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले. तर 11 सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्य अशा एकूण 19 पदकांसह चीनने दुसरे स्थान पटकावले. जरी भारताने चीनच्या एकूण 19 पदकांशी बरोबरी केलेली असली, तरी कमी संख्येने सुवर्णपदके जिंकलेली असल्यामुळे त्यांना गुणतालिकेत तिसरे स्थान मिळाले. भारताने सहा सुवर्ण, सात रौप्य आणि सहा कांस्यपदके