दोन वर्षांनी अॅशेसमध्ये करणार कमबॅक
वृत्तसंस्था/ लंडन
2021 च्या उन्हाळ्याच्या शेवटी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या मोईन अलीने कसोटी कर्णधार बेन स्टोक्स, कसोटी मुख्य प्रशिक्षक ब्रेंडॉन मेकॉलम आणि ईसीबीचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपला निर्णय मागे घेतला आहे, याबाबत ईसीबीने माहिती दिली. मोईन अलीने कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती मागे घेतली आहे. संघ व्यवस्थापनाशी चर्चा झाल्यानंतर त्याला इंग्लंडच्या अॅशेस संघामध्ये सामील करण्यात आले. मोईनने सोमवारी रात्री सांगितले की जॅक लीचच्या दुखापतीनंतर त्याला संभाव्य संघातील जागेसाठी फोनवरून विचारात घेण्यात आले होते.
इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेला 16 जूनपासून सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यासाठी मोईन अलीचा इंग्लंडच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. त्याने दुखापतग्रस्त जॅक लीचची जागा घेतली आहे. दरम्यान, मोईनची बेन स्टोक्स, ब्रेंडन मेकॉलम आणि रॉब की यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. अनुक्रमे इंग्लंडचा कर्णधार, प्रशिक्षक आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच ईसीबीने बुधवारी सकाळी मोईनला कसोटी क्रिकेटमध्ये परतण्यास सहमती दर्शविली आहे. एजबॅस्टन आणि लॉर्ड्स येथील पहिल्या दोन अॅशेस कसोटींसाठी त्याचा इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आला. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या जॅक लीचशिवाय इंग्लंडकडे दुसरा कोणताही फिरकी गोलंदाज उपलब्ध नाही. अशा स्थितीमध्ये अॅशेज मालिका डोळ्यासमोर ठेऊन मोईन अलीला माघारी बोलवण्यात आले असल्याचे ईसीबीकडून सांगण्यात आले.
पहिल्या दोन सामन्यांसाठी इंग्लंडचा अॅशेस संघ : बेन स्टोक, मोईन अली, जेम्स अॅंडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, मॅथ्यू पॉट्स, ऑली रॉबिन्सन, जो रुट, जोश टंग, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड.