वृत्तसंस्था/ जीनिव्हा
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंज महापात्र यांची जागतिक हवामान संघटनेच तिसरा उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. मूळचे ओडिशाचे रहिवासी असलेले महापात्र यांना भारताचे ‘सायक्लोन मॅन’ म्हणून ओळखले जाते. 2019 पासून ते भारतीय हवामान विभागाची धुरा सांभाळत आहेत. महापात्र यांच्यासोबत दोन अन्य जणांचीही डब्ल्यूएमओच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आयर्लंडच्या मेट ईरेनचे संचालक इयोन मोरन आणि कोटे डी आइवरच्या हवामान विभागाचे संचालक डौडा कोनाटे यांचा यात समावेश आहे. डब्ल्यूएमओची निवडणूक जीनिव्हात पार पडली आहे.
या निवडणुकीत संयुक्त अरब अमिरातच्या राष्ट्रीय हवामान विभागाचे संचालक अब्दुल्ला अल मंदौस डे डब्ल्यूएमओचे अध्यक्ष निवडले गेले आहेत. अब्दुल्ला अल मंदौस यांचा कार्यकाळ चार वर्षांचा राहणार आहे. अर्जेंटीनाच्या सेलेस्टे साउलो यांना डब्ल्यूएमओच्या पहिल्या महिला महासचिव ठरल्या आहेत.