ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मोहसीन शेख हत्या प्रकरणात हिंदू राष्ट्रसेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याच्यासह 20 जणांची पुणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 02 जून 2014 ला पुण्यातील हडपसर भागात मोहसीन शेखची हत्या झाली होती.
छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर टाकल्यामुळे जून 2014 मध्ये हडपसरमध्ये दंगल झाली होती. यावेळी हिंदू राष्ट्रसेनेने तोडफोड केली होती. याचवेळी मोहसीनला त्याच्या दाढी आणि पेहरावावरून हटकत मारहाण करण्यात आली होती. ज्यात त्याचा मृत्यू झाला होता. हिंदू राष्ट्रसेनेचा प्रमुख धनंजय देसाई याच्यासह या संघटनेच्या वीस जणांवर मोहसीनच्या हत्येचा आरोप होता. याप्रकरणी पोलिसांनी धनंजय देसाईंसह 23 जणांना येरवडय़ातून अटक केली होती.
अधिक वाचा : प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे; मनुस्मृतीवरील विधानाचा बानवकुळेंनी घेतला समाचार
2019 धनंजय देसाईंना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. दरम्यान, या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी देसाई यांच्यासह संघटनेच्या 20 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.