सर्व प्रभागांमधील गटरांची साफसफाई. अतिरिक्त कामगारांच्या मदतीने काम. मोन्सनच्या आगमनाची तयारी जोरात
डिचोली/प्रतिनिधी
पावसाळय़ात तुंबलेल्या गटरांमुळे चाखलमिश्रीत पाणी रस्त्यावर येऊन लोकांना त्रास होऊ नये यासाठी डिचोली नगरपालिकेने हाती घेतलेले मोन्स?नपूर्व काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. सर्व चौदाही प्रभागांमधील गटरांची साफसफाई नगरपालिकेकडून करण्यात आली आहे. तर सध्या पालिकेतर्फे रस्त्याखालून असलेली सर्व क्रॉस डेनेज साफ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
डिचोली नगरपालिकेतर्फे पावसाळा सुरू होण्यापूर्वी मोन्स?नपूर्व कामे नियमितपणे करण्यात येतात. पावसाळय़ात गटरांमध्ये पाणी तुंबून लोकांना नाहख त्रास होऊ नये यासाठी नगरपालिका सतर्क असते. यावषी मोन्स?न गोव्यात लवकरच धडकणार अशी शक्मयता वेधशाळेने दिल्याने डिचोली नगरपालिकेने पालिका क्षेत्रातील मोन्स?नपूर्व कामे दिड महिना अगोदरच सुरू केली होती.
या कामासाठी पालिका कामगारांसह अतिरिक्त कामगारांना घेण्यात आले होते. सर्व चौदाही प्रभागांमधील मुख्य रस्ता तसेच अंतर्गत रस्त्याच्या बाजूला असलेली गटरे साफ करण्यात आली आहे. मोठय़ा प्रमाणात माती व कचरा या साफसफाईत काढण्यात आला. तसेच पावसाळय़ात प्रवाहीत होणारे नैसर्गिक नाले व ओहोळही साफ करण्यात आले आहेत. या सर्व कामांसाठी सुमारे 4.85 लाख रूपये खर्च करण्यात आल्याचे नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी सांगितले.
शहरात व पालिका क्षेत्राच्या परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी डिचोली नगरपालिका सदैव तत्परतेने काम करते. पावसाळय़ात पाण्याचा प्रवाह मोठा असतो. यावेळी गटरामध्ये साचणाऱया कचऱयामुळे गटरे तुंबतात आणि पाणी रस्त्यावरून वाहते. काहीवेळा हे पाणी काही खालच्या भागात असलेल्या घरांमध्येही शिरते. त्यासाठी सर्व गटरे साफ करण्याची खबरदारी पालिका घेतली त असते. पावसाळय़ात आपापल्या परिसरातील गटरांमध्ये कचरा तसेच झाडे कापून झाडांच्या लहान मोठय़ा फांद्या टाकू नये. नपेक्षा थेट स्थानिक नगरसेवक किंवा पालिकेला.संपर्क साधून सदर कचरा उचलण्याची कल्पना द्या. जेणेकरून गटरे पावसखत कचऱयामुळे तुंबणार नाही, असे आवाहन नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी केले आहे.
नगरपालिका क्षेत्रतील सर्व गटरांची साफसफाई झालेली आहे. सर्व नगरसेवकांनी आपापल्या भागातील गटरे स्वतः उपस्थित राहून साफ करून घेतली आहे. यावेळी खूप अगोदरच काम सुरू केल्याने काम लवकर संपले तसेच काही दिवस मध्येच पाऊस पडल्याने गटरांमध्ये पुन्हा साचलेली माती व कचरा साफ करण्याची संधी मिळाली. आता रस्त्यांवर असलेल्या क्रॉस डेनेज साफ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. लवकरच हे कामही पूर्ण होणार असल्याने पाऊस सुरू होण्यापूर्वी डिचोली नगरपालिकेची सर्व कामे पूर्ण होणार आहेत, अशी माहिती पालिका कनि÷ अभियंता राजेश फडते यांनी दिली.