मान्सून देशातून परतला असून तो समाधानकारक नसल्याची मोहर उठवून गेला आहे. एखाद्या वर्षी मान्सून कमी झाल्यास पावसाचे महत्त्व समजून घेणे गरजेचे झाले आहे. 80 टक्के शेतकरी अर्थ व्यवस्थ्sाचा कणा असल्याने पाऊस महत्त्वाचा झाला आहे. मात्र सरकारी पातळीवरून पारंपारिक शेती पध्दतीत बदल, प्राप्त पावसाची साठवणूक करणे, निसर्गपूरक सवयी यात बदल करणे हेच यंदाच्या पावसाची तूट दाखवून देते. पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी मुद्यावर चर्चा होते. मात्र अशा चर्चामधून बदलत्या पावसाने शेतीचे बदलणारे धोरण काय यावर अभ्यासपूर्ण भाषण होताना fिदसून येत नाही. ही खंत आहे…
देशातून मान्सून परतला असला तरी देखील मुंबईतून तो 10 ऑक्टोबरपर्यंत परतेल असे हवामान तज्ञ सांगत आहे. या कालावधीत हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र गेल्या दोन तीन वर्षापासून पावसाचा परतण्याचा पॅटर्न बदलला आहे. त्यामुळे परतण्याच्या कालावधीत पावसाचा उपयोग होण्याइतपत पडेलच असे नाही. म्हणून पुढील मान्सूनपर्यंत तुर्तास पावसाला पुनरागमनायच म्हणावे. तुर्तास मान्सूनची 10 ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह राज्याला हलक्या स्वऊपात पावसाची साथ असेल. दरम्यान यंदा एननिनोचा प्रभाव होता. मात्र साठ टक्के मान्सून झाल्यानंतर एलनिनोला बळकटी मिळाली. तर एलनिनोचा बहर डिसेंबरपर्यंत असतो. त्यामुळे यंदा जुलैनंतर त्याचा बहर दिसू लागला. त्यातून जुलै महिन्यात पाऊस झाला. नेहमीच एलनिनो असल्यास मान्सून ढेपाळतो असे नेहमीच घडत नाही. कारण एलनिनोला टोलवण्यासाठी इंडियन ओशियन डायपोल असतो. यावेळी आयओडी सप्टेंबर महिन्यात बळकट झाल्याने या महिन्यात जोरदार पाऊस झाला. दरम्यान राज्यात नऊ जिह्यात पाऊस कमी झाला. या नऊ जिह्यात सातारा, सांगली, सोलापूर, धाराशीव, बीड, जालना, हिंगोली, अकोला आणि अमरावती असे नऊ जिल्हे असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या सुषमा नायर यांनी सांगितले.
दरम्यान 1 जून ते 29 सप्टेंबरपर्यंत राज्यात 953.9 मिमी एवढा पाऊस झाला. यात नॉर्मल सरासरी 990.7 मिमी अशी असते. यात उणे 4 टक्के तुटवडा असून साधारण पाऊस असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान कोकण पट्टयात पालघर, ठाणे आणि मुंबई उपनगरे या जिह्यात अधिक पाऊस झाला. शहर रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्गात नॉर्मल पाऊस झाला. राज्यातील 9 जिह्यात मान्सून तुटवडा दिसून आला असून यात सांगली, सातारा, सोलापूर, बीड, धाराशीव, हिंगोली, जालना, अकोला आणि अमरावती असे ते जिल्हे आहेत. यात सांगली, सातारा जिह्यात तुटवड्याची टक्केवारी सर्वाधिक आहे. तसेच राज्यात मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरासरीची उणे 13 तुटवडा दिसून येत आहे. मात्र मान्सून नॉर्मल आहे. यात अहमदनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, नंदूरबार, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर असे दहा जिल्हे येत असून यात अखेरच्या सांगली, सातारा आणि सोलापूर जिह्यात कमालीचा तुटवडा दिसून आला. सांगली, सातारा आणि सोलापूर अशा तिन्ही जिह्यात अनुक्रमे उणे 44, उणे 38 तर उणे 31 टक्के असा तुटवडा असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात येत आहे. तसेच मराठवाडा विभागातील बीड, छ. संभाजीनगर, धाराशीव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड आणि परभणी अशा आठ जिह्यापैकी बीड, धाराशीव, हिंगोली, जालना या चार जिह्यात तुटवडा आहे. उर्वरित चार जिल्हे नॉर्मल वर्गवारीत मोडणारे आहेत. विदर्भ विभागात अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ अशा अकरा जिह्यांपैकी अकोला, अमरावती जिह्यात मान्सून तुटवडा होता. यंदाच्या मान्सून कालावधीत जून महिना कोरडा तर जुलैचे पंधरा दिवस पावसाचे आणि ऑगस्ट तर राज्यात पूर्ण कोरडाच गेला. याच महिन्यात शेतकऱ्यांच्या आर्त तक्रारी ऐकायला मिळाल्या. ऑगस्ट हा महिना पावसाचा म्हटला जात असला तरी यावर्षी याच महिन्यात पावसाने दडी मारल्याने राज्यातील सुमारे दोन हजार गावांना टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची वेळ आली आहे. ही सर्व आकडेवारी सप्टेंबर महिन्याच्या सुऊवातीची आहे. तसेच टंचाईग्रस्त गावांमध्ये पुणे आणि नाशिक विभागांतील गावे अधिक प्रमाणात आहेत. यंदा मात्र मान्सून सुऊ झाल्याने कोकण तसेच विदर्भात चांगला पाऊस झाल्याने या दोन्ही विभगात एकसुद्धा टंचाईग्रस्त गावाची नोंद नसल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी म्हणजे 5 सप्टेंबर 2022 पर्यंत राज्यात फक्त 14 गावे टँकरग्रस्त असल्याची नोंद होती. मात्र तुलनेत याच कालावधीत यंदा सुमारे दोन हजार गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. दिलेल्या माहितीनुसार 7 ऑगस्टपर्यंत राज्यात 1554 गावे आणि वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. मात्र ऑगस्टमध्ये पाऊस न झाल्याने टँकरग्रस्त 400 गावे यात वाढली. मराठवाडा, औरंगाबाद आणि जालना तीन जिह्यातील काही गावे पाणी टंचाईग्रस्त होती. त्याचवेळी राज्याच्या पाणीपुरवठा विभागाच्या साप्ताहिक अहवालात 4 सप्टेंबपर्यंतच्या देण्यात आलेल्या टंचाईग्रस्त गावांच्या माहिती अहवालानुसार राज्यात 1955 गावे आणि वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. यात पुणे विभागातील सर्वाधिक गावे म्हणजे 1206 गावे आणि वाड्या होत्या. त्यानंतर नाशिक विभागातील 168 गावे आणि 501 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. तर मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना जिह्यातील काही गावे टँकरग्रस्त होती. दोन्ही जिह्यांतील मिळून 53 गावे आणि 22 वाड्याची नोंद होती. एकंदरीत यंदा एलनिनोचा प्रभाव असूनही मान्सून नार्मलच्या वर्गवारीत राहिला. एलनिनोमुळे जूनची सरासरी गाठली नाही. तर जुलैच्या शेवटच्या पंधरवड्याने किंचित वाचवले. ऑगस्टमध्ये मान्सूनची सरासरी घटली होती. तर सप्टेंबरमध्ये आयओडी स्थितीमुळे पावसाने सरासरी गाठली. त्यामुळे यंदाच्या एलनिनोचा प्रभाव आगामी मान्सूनवर कसा परिणाम करणार या प्रश्नाने यंदाचा मोसमी मान्सून वाऱ्याचा प्रवास तुर्तास थांबला आहे. तोपर्यंत मान्सूनने पुन्हा यावे असे आवाहनच हाती आहे.
एखाद्या वर्षी मान्सून कमी झाल्यास पावसाचे महत्त्व समजून घेणे गरजेचे झाले आहे. 80 टक्के शेतकरी अर्थ व्यवस्थ्sाचा कणा असल्याने पाऊस महत्त्वाचा झाला आहे. मात्र सरकारी पातळीवरून पारंपारिक शेती पध्दतीत बदल, प्राप्त पावसाची साठवणूक करणे, निसर्गपूरक सवयी यात बदल करणे हेच यंदाच्या पावसाची तूट दाखवून देते. पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी मुद्यावर चर्चा होते. मात्र अशा चर्चामधून चर्चेत बदलत्या पावसाने शेतीचे बदलणारे धोरण काय यावर अभ्यासपूर्ण भाषण होताना fिदसून येत नाही. त्यासाठी लोकप्रतिनिधीनी हवामान खात्याचे अधिकारी शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, जलतज्ञ यांच्याशी चर्चा करणे महत्त्वाचे झाले आहे. अशा धोरणात्मक विचारांकडे वळल्यास राज्य सुकाळच्या दिशेने मार्गस्थ होईल आणि पाऊस कमी झाल्याची चिंताही मिटेल.
राम खांदारे