Maharashtra Monsoon Session 2023 : पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झालीय.विधेयकं सादर केली जात आहेत. मात्र सर्वात आधी विरोधकांनी शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला.सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देत नाही अस म्हणत विरोधकांनी सभा त्याग केला. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात आले. बाळासाहेब थोरांतांनी (Balasaheb Thorat) शेतकरी मुद्द्यांवर सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी बाळासाहेब थोरातांनी केलेल्या आरोपाला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्यूत्तर दिले.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले की, महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती गांभीर्यपूर्वक पाहणे गरजेचे आहे.यंदा पाऊस उशीरा सुरु झाल्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास 50 टक्के भागात पाऊस नाही. आतापर्यंत 20 टक्के एवढ्याच पेरण्या झाल्या आहेत.यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मागे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.याची मदत अजून शेतकऱ्यांपर्यंत (Farmer) पोहचली नाही. पारनेरला मुख्यमंत्री , पालकमंत्र्यांनी नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी करून आठ दिवसात मदत देतो असे जाहीर केले. मात्र, अजून मदत मिळाली नाही. बोगस बियाने, खते बाजारात आली आहेत.काही टोळ्या सरकारी आहेत असं दाखवून राज्यात हफ्ते वसूल करत आहेत, असा आरोप थोरात यांनी केला.सरकारच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे असा प्रस्ताव त्यांनी मांडला.
यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, यंदा राज्यात पाऊस कमी झाला आहे. मात्र 80 टक्के पेरण्या झाल्या आहेत. शासनाने एक आराखडा तयार केला आहे.बोगस खते-बियानावर कारवाई होणारच.या संदर्भात कायदा देखील केला जाणार आहे. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात खूप गंभीर आहे. सरकारला देखील शेतकऱ्यांची चिंता आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.