मुंबई
फॅशन विश्वात रमणाऱ्या माँटे कार्लो फॅशन्सचा समभाग 7 महिन्यांच्या उच्चांकावर कार्यरत राहिला असल्याचे दिसून आले आहे. कंपनीने मार्चअखेरच्या चौथ्या तिमाहीत 56 टक्के निव्वळ नफा अधिक कमावला आहे. मंगळवारी शेअरबाजारात कंपनीचा समभाग 16 टक्के इतका वधारत 873 रुपयांवर पोहचला होता. चौथ्या तिमाहीत कंपनीने 19.8 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असून तो मागच्या वषौच्या तुलनेत 56 टक्के अधिक आहे. या बातमीचा परिणाम समभागाच्या भावावर सकारात्मक दिसून आला.