Mopa airport should be named after song empress Lata Mangeshkar: Nandkumar Naik
गोव्यातील पेडणे येथील मोपा विमानतळाला गान गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांचे नाव देण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुका मराठा समाज ट्रस्ट ( रजी ) चे संस्थापक नंदकुमार विठ्ठल नाईक यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया तसेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन दिले आहे.
मूळ दोडामार्ग तालुक्यातील वायंगणतड येथील रहिवासी व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या नंदकुमार नाईक यांनी खास इमेलद्वारे श्री. सिंधिया तसेच डॉ. सावंत यांना आपले निवेदन पाठविले आहे. आपल्या भारताच्या गान कोकिळा म्हणून संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेल्या स्व. लतादीदी मंगेशकर यांचे संगीत – गायन क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे. गायन क्षेत्रातील अनेक पुरस्कार, मानपत्र तसेच विविध पारितोषिके व विक्रम स्व. लता मंगेशकर यांच्या नावे अजरामर झाली आहेत. अशा महान गायिकेचे नाव जर नव्याने साकारण्यात आलेल्या मोपा विमानतळाला दिले तर स्व. लतादीदींनी गोमंतकीय तसेच देशातील जनतेकडून एक विशेष आदरांजली ठरेल असेही श्री. नाईक यांनी स्पष्ट केले आहे.
दोडामार्ग – वार्ताहर