मध्यप्रदेशात सर्वाधिक प्रमाण : पश्चिम बंगाल दुसऱ्या स्थानावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2019-2021 दरम्यान तीन वर्षांमध्ये देशात 13.13 लाखाहून अधिक महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. यातही महिला अन् मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण मध्यप्रदेशात सर्वाधिक होते. तर याप्रकरणी पश्चिम बंगाल दुसऱ्या स्थानावर आहे. संसदेत सादर करण्यात आलेल्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशभरात 2019-21 दरम्यान 18 वर्षांपेक्षा 10,61,648 महिला आणि त्याहून कमी वयाच्या 2,51,430 मुली गायब झाल्या आहेत.
हा डाटा एनसीआरबीकडून संकलित करण्यात आला आहे. संसदेला उपलब्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मध्यप्रदेशात 2019-21 या कालावधीत 1,60,18 महिला आणि 38,234 मुली गायब झाल्या आहेत. याच कालावधीत पश्चिम बंगालमधून एकूण 1,56,905 महिला आणि 36,606 मुली बेपत्ता झाल्या आहेत. महाराष्ट्रात याच कालावधीत 1,78,400 महिला आणि 13,033 मुली गायब झाल्या आहेत.
ओडिशात तीन वर्षांमध्ये 70,222 महिला आणि 16,649 मुली गायब झाल्या आहेत. तर याचदरम्यान छत्तीसगढमधून 49,116 महिला आणि 10,817 मुली गायब झाल्या आहेत. केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्लीत महिला आणि महिला बेपत्ता होण्याची संख्या सर्वाधिक राहिली आहे. राष्ट्रीय राजधानीत 2019-21 या कालावधीत 61,054 महिला आणि 22,919 मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर जम्मू-काश्मीरमध्ये 8,617 महिला आणि 1,148 मुली गायब झाल्या आहेत.