नवी दिल्ली
आर्थिक वर्ष 2023 मध्ये एप्रिल-जानेवारी दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेच्या लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (एलआरएस) अंतर्गत परदेशात मोठ्या प्रमाणात पैसे पाठवले आहेत. मागील आर्थिक वर्षाच्या (आर्थिक 2022) आकड्यांना मागे टाकले आणि सर्वकालीक उच्चांक गाठला. आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे हा टप्पा अधिक बळकट होत राहिला आहे.
मार्चच्या मासिक बुलेटिनमध्ये रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, एप्रिल-जानेवारी दरम्यान या योजनेंतर्गत परदेशात जाणारा पैसा 22.08 अब्ज डॉलर होता. एकट्या जानेवारी 2023 मध्ये एकूण 2.72 अब्ज डॉलर्स परदेशात पाठवण्यात आले आहेत.
आर्थिक वर्ष 2022 मध्ये, भारतीयांनी रिझर्व्ह बँकेच्या एलआरएस योजनेंतर्गत 19.61 बिलियन डॉलरपेक्षा थोडे अधिक पैसे पाठवले, जे आतापर्यंतचे सर्वाधिक आहेत. चालू आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या 10 महिन्यांनी गेल्या वर्षी याच कालावधीतील विक्रम मोडला असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.
आर्थिक वर्ष 21 मध्ये, साथीच्या रोगामुळे परदेशात जाणाऱ्या पैशांचा ओघ फारच कमी होता, कारण तेथे अनेक निर्बंध होते आणि आंतरराष्ट्रीय प्रवास बराच काळ स्थगित होता.