भारतातही होणार लवकरच सादर : 60 मेगापिक्सलचा दमदार कॅमेरा
मुंबई:
मोटोरोला कंपनीचा ‘एज प्लस 2023’ हा नवा स्मार्टफोन जागतिक स्तरावर लाँच करण्यात आला आहे. लवकरच हा नवा स्मार्ट फोन भारतात लाँच केला जाणार आहे. फोनची सुरुवातीची किंमत 65 हजार रुपये इतकी असणार असल्याची माहिती असून सदरचा फोन सॅमसंग व अॅपलच्या प्रिमियम गटातील फोनशी टक्कर देणार आहे.
अनेक सुधारित वैशिष्ट्यांचा या फोनमध्ये समावेश केला गेला असून स्टॉक अँड्रॉइड सॉफ्टवेअरसह हा फोन येणार आहे. मेटल (धातू) बॉडीसह येणारा हा फोन कॉर्निंग गोरीला ग्लाससह येईल.
6.7 इंचाच्या डिस्प्लेसह 4 के व्हिडीयो रेकॉर्डिंग
आयपी 68 प्रमाणित फोन वॉटर व डस्ट रेसिस्टन्स आहे. 203 ग्रॅम वजनासह काळ्या रंगात सध्या उपलब्ध असून 6.7 इंचाचा पोलेड डिस्प्ले स्क्रीन याला आहे. 60 मेगापिक्सलचा दमदार कॅमेरा व 4 के व्हिडीयो रेकॉर्डिंगची सुविधा यात असणार आहे.