सांगरूळ कुस्ती मैदान व सत्कार समारंभात ग्वाही
सांगरूळ / वार्ताहर
राजर्षी शाहू महाराजांच्या कर्तुत्वामुळे कोल्हापूर जिल्ह्याची राज्यात अन देशात वेगळी ओळख आहे .याच मातीतील स्व .खाशाबा जाधव यांनी आपल्या देशाला ऑलिंपिक स्पर्धेत कुस्ती मध्ये पहिले पदक मिळवून दिले आहे. येथील खेळाडूंना पाठबळ देण्यासाठी सर्व सोयीने युक्त आदर्शवत असे निवासी क्रीडा संकुल उभा करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू अशी ग्वाही खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
सांगरुळ (ता करवीर) येथील राजर्षि शाहू नाळे तालीम मंडळाच्या वतीने आयोजित कुस्ती मैदान व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार चंद्रदीप नरके होते.
यावेळी बोलताना खा. श्रीकांत शिंदे म्हणाले सांगरुळचे ग्रामदैवत श्री ज्योतिबा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर सुशांत नाळे यांनी राजर्षि शाहू नाही तालीम मंडळाच्या वतीने अतिशय चांगल्या दर्जाची कुस्ती मैदान घेतले आहे .नामवंत मल्लांच्या कुस्त्या पाहण्याची संधी कुस्तीशौकीनांना उपलब्ध करून दिली . कुस्ती शौकीननी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला दाद दिली आहे हे कौतुकास्पद आहे .कोल्हापूरच्या विकासासाठी केलेल्या विविध मागण्यांचा शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .
माजी आमदार चंद्रदीप नरके म्हणाले कोल्हापूर ही खेळाडूंची खान आहे .येथे कुस्ती बरोबरच फुटबॉल हँडबॉल, नेमबाजी, कबड्डी इत्यादी खेळात चमकदार कामगिरी करणारे खेळाडू मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्वांना पाठबळ देण्यासाठी दर्जेदार क्रीडा संकुल उभा करावे. महिला कुस्तीगीरांबरोबरच सर्वच खेळ प्रकारातील महिला खेळाडूंना चांगल्या प्रकारचा सराव करता यावा यासाठी निवासी क्रीडा संकुल उभा करावे व तज्ञ मार्गदर्शनाची नेमणूक करावी अशी मागणी केली. सुरुवातीस स्वागत व प्रास्ताविक मैदानाचे संयोजक पैलवान सुशांत नाळे यांनी केले. यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी खा. संजय मंडलिक खा. धैर्यशील माने आमदार जयंत आसगावकर जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील संचालक अजित नरके एस आर पाटील कुंभीचे उपाध्यक्ष विश्वास पाटील निवास वातकर राहुल खाडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार सर्जेराव नाळे यांनी मानले.
१९५० च्या मैदानाच्या आठवणीना उजाळा
कुस्तीप्रेमी बाबा महाडिक यांनी ७३ वर्षांपूर्वी १९५० साली सांगरुळ येथे झालेल्या कुस्ती मैदानाची जाहिरात मैदानात दाखवत या मैदानात लढलेल्या गावातील त्यावेळच्या पैलवानांची नावे वाचून दाखवलीत . आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला .उपस्थित नागरिक ही आपल्या वाड वडिलांची जाहिरातीत असलेली नावे ऐकून भारावून गेलेत .बाबा महाडिक यांच्या या उपक्रमाचे उपस्थितानी टाळ्या वाजवत जोरदार स्वागत केले .